महाविकास आघाडीत असताना दादांचा ७० हजार कोटींचा घोटाळा दिसला नाही का? नितेश राणेंचा सवाल

Nitesh Rane
Nitesh Rane
Updated on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार बंड करत भाजप-शिवसेना गटात जावून उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्याचवेळी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप होत आहेत.

वास्तविक भाजपनेच अजित पवार यांच्यावर अशा स्वरुपाचे आरोप केले होते. मात्र आता सत्तेत सामील झाल्यानंतर नितेश राणे यांनीच अजित पवार यांच्याबाबत उद्धव ठाकरे गटाला अजब सवाल केला आहे.

Nitesh Rane
Ajit Pawar: पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर अजितदादा पुन्हा ॲक्टिव्ह! कृषिमंत्री धनंजय मुंडेंसोबत महत्वाची बैठक

नितेश राणे म्हणाले की, दादा महाविकास आघाडीत असताना तुम्ही दादांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. तेव्हा अजित दादांचा ७० हजार कोटींचा घोटाळा दिसला नाही का? असा सवाल नितेश राणे यांनी केला. जे शिवसेनेचे आमदार आमच्याबरोबर सत्तेत आहेत, त्यांच्यावर जे आरोप आहेत, ते आरोप महाविकास आघाडीच्या काळात पण होते. सत्तेत असताना तुम्हाला त्यांचे घोटाळे दिसले नाहीत का? असंही राणे यांनी विचारलं.

Nitesh Rane
Ajit Pawar: अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, पण...; देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले?

दरम्यान उठसूट आमच्यावर आरोप कऱण्यापेक्षा स्वत:च्या बुडाखाली किती आग लागली आहे ते तुम्ही पाहा. संजय ऱाऊतांना मी आव्हान करतो की, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्यासोबत व्यासपीठावर या...जागा, वेळ आणि तारीख तुम्हीच ठरवा, असही नितेश राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mumbai-to-Konkan Modi Express Schedule and Booking Information For Ganeshotsav
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com