'काही म्हणा.. बायको शिवसेनेसारखी पाहिजे'

सोमवार, 31 डिसेंबर 2018

कोणी काही का म्हणेना पण, बायको ही शिवसेनेसारखी मिळायला हवी अशी टीका आज नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटद्वारे म्हटले आहे की, असंख्य नवरे बोलत असतील, की बायको शिवसेने सारखी पाहिजे.

मुंबई- कोणी काही का म्हणेना पण, बायको ही शिवसेनेसारखी मिळायला हवी अशी टीका आज नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटद्वारे म्हटले आहे की, असंख्य नवरे बोलत असतील, की बायको शिवसेने सारखी पाहिजे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, नवऱ्याची कीतीही लफडी कळाली तरी ती सोडून जाण्याचे धाडस करत नाही. जास्तीत जास्त काय तर, एखादा सामना या मुखपत्रातून अग्रलेख लिहण्याचे धाडस करील यापेक्षा जास्त काही करणार नाही. बाकी मग संसार मात्र सुरळीत चालू राहणार. अशा खोचक शब्दात नितेश राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.

नितेश राणे यांनी एकूणच सध्या शिवसेनेच्या चालू असलेल्या वर्तवणूकीवर त्यांनी टिपण्णी केली आहे. शिवसेना ही सातत्याने सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देत असते. परंतु, शिवसेनेला सत्ता सोडत नाही. भाजपने कीतीही शिवसेनेसोबत वाईट वागले तरी सेना भाजपचा हात सोडायला तयार नसल्याचे नितेश राणेंना म्हणायचे आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमधून त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीवर टीका केली आहे.

दरम्यान काल (ता.30) नारायण राणे यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात युती होणार आणि जर शिवसेना आणि भाजपमध्येयुती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा युतीसोबत जाणार नसल्याचे काल एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले होते.

Web Title: Nitesh Rane Criticised On Shivsena