सोमय्या हल्ल्यावरुन राणे भडकले, मातोश्रीत बसलेल्या सो कॉल्ड मर्दाने... I Nitesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमय्या हल्ल्यावरुन राणे भडकले, मातोश्रीत बसलेल्या सो कॉल्ड मर्दाने...

ठाकरेंच्या गुंडांकडून भाजप नेत्यांवर हल्ला होतोय, हे शौर्याचं लक्षण नाही

सोमय्या हल्ल्यावरुन राणे भडकले, मातोश्रीत बसलेल्या सो कॉल्ड मर्दाने...

काल रात्री उशिरा भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलिस स्टेशनला गेले असता हा प्रकार घडला. सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ते परतत असताना खार पोलिस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, आता त्यांच्यावरील या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करत ठाकरे सरकार आणि शिवसैनिकांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: Navneet Rana LIVE | सोमय्यांच्या हल्ल्यानंतर वळसेंची पहिली प्रतिक्रिया, 'दगडफेक झाली हे खरं'

आमदार राणे ट्विटमध्ये म्हणतात की, ठाकरेंच्या गुंडांकडून पोलिसांच्या संरक्षणात राज्यातील भाजप नेत्यांवर दररोज हल्ला होणार असेल तर हे शौर्याचं लक्षण नाही, मातोश्रीत बसलेल्या सो कॉल्ड मर्दाने पोलिसांना फक्त २४ तासांसाठी सुट्टीवर पाठवावं, आम्ही खात्री देतो की हे सर्व थांबवू, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर भाजपा नेते खवळले असल्याची चर्चा आहे. अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना समोर आली. तर, सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. यात हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची आली असून किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले आहेत. याप्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भाजपा यावर का प्रतित्त्युर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: अमरावतीत शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गोळीबाराने खळबळ

Web Title: Nitesh Rane Criticized To Uddhav Thackeray On Kirit Somaiya Attack For Shivsainik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top