Vidhan Sabha 2019 : राणेंचा भाजपप्रवेश शिवसेना मान्य करणार का? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नितेश राणे यांना भाजप प्रवेश दिल्याने सिंधुदूर्गसह कोकणातील शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली असून बंडखोरी होण्याचे संकेत आहेत. भाजपच्या याच राजकिय कुरघोडीमुळे राज्यभरात शिवसेना अनेक मतदारसंघात बंड करण्याच्या तयारीत असून भाजपने देखील शिवसेनेच्या मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.

मुंबई : काँग्रेसचे आमदार व नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी आज (गुरुवार) अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना-भाजप युतीच्या समझोत्यात कळीचा मुद्दा ठरलेल्या राणे यांना भाजपने सतत हुलकावनी दिली. मात्र आज अखेर भाजपने नितेश यांना पक्षप्रवेश देत शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. 

Vidhan Sabha 2019 : बाळासाहेबांचे दर्शन घेऊन आदित्यने टाकले मातोश्रीबाहेर पाऊल

नितेश राणे यांना भाजप प्रवेश दिल्याने सिंधुदूर्गसह कोकणातील शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली असून बंडखोरी होण्याचे संकेत आहेत. भाजपच्या याच राजकिय कुरघोडीमुळे राज्यभरात शिवसेना अनेक मतदारसंघात बंड करण्याच्या तयारीत असून भाजपने देखील शिवसेनेच्या मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात एबी फाॅर्म देखील रवाना करत ऐनवेळची काळजी घेतल्याची माहिती आहे. 

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; ही आहेत नावे

दरम्यान अनेक मतदार संघात स्थानिक पातळीवरील युतीतला तणाव शिगेला पोचला असून मुख्यमंत्री व उध्दव ठाकरे यांची बंड शमवताना दमछाक सुरू आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून बंडखोरी रोखण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane enters BJP and he submitted AB form in Kankawali