नितेश राणे यांची सिंधुदुर्ग पोलिसांकडून दीड तास चौकशी

संतोष परब मारहाण प्रकरणात पोलिसांना सहकार्य करणार आहे.
Nitesh Rane in Santosh Parab Case
Nitesh Rane in Santosh Parab Casegoogle

सिंधूदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे हे आज सोमवारी (ता.२४) पोलिसांसमोर चौकशीला उपस्थित होते. संतोष परब मारहाण प्रकरणात पोलिसांना सहकार्य करणार आहे. तसेच अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर लढा कायम ठेवणार, असा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले. सिंधुदूर्ग पोलिसांकडून राणेंची दीड तास चौकशी झाली असल्याचे कळते.(Nitesh Rane Face Sindhudurg Police Investigation In Santosh Parab Beaten Case)

Nitesh Rane in Santosh Parab Case
उत्तर भारतात तेव्हा सेनेची लाट होती, आमचा पंतप्रधान झाला असता - संजय राऊत

मुंबई उच्च न्यायालयाने संतोष परब हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र त्यांना २७ जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. यातील सहआरोपी संदेश ऊर्फ गोट्या सावंत याचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र मनिष दळवी या अन्य आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. सिंधुदुर्गमधील शिवसेनेचे संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. याचा कट राणे यांनी रचल्याचा पोलिसांच्या चौकशी स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नितेश राणे यांच्यावर नोंदविण्यात आला आहे. (Nitesh Rane News Updates)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com