गिरगाव चौपाटीच्या व्हिविंग गॅलरीवरून राणे आक्रमक; आदित्य ठाकरेंवर टीका

'पर्यटनमंत्र्यांच्या हट्टापायी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी उभी केली जातेय'
Politics
Politicsgoogle
Summary

'पर्यटनमंत्र्यांच्या हट्टापायी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी उभी केली जातेय'

केंद्रिय तपास यंत्रणांचे महाविकास आघाडी नेत्यांवरील कारवाई सुरु आहे. परिणामी विरोधक आणि सत्ताधारी यांचे एकमेकांवरील आरोप्रत्यारोपांचे सत्र चालु आहे. दरम्यान, आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. पर्यटनमंत्र्यांच्या हट्टापायी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी उभी करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी कानपिचक्या मारल्या आहेत. मुबंई (Mumbai) आयुक्तांनी एमआरटीपी अॅक्टनुसार कारवाई करावी अन्यथा अधिकाऱ्यांवरच कारवाईसंबंधी न्यायलयात दाद मागणार असल्याचे वक्तव्य केलं आहे.

आमदार राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, मुंबई महापालिकेकडून जनतेच्या पैशाचा गैरवापर सुरु आहे. सर्व सीआरझेटचे नियम धाब्यावर बसवले जातं आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून पर्यावरणमंत्र्याच्या हट्टासाठी गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी उभी केली जात आहे. यावर आयुक्तांनी एमआरटीपी अॅक्टनुसार कारवाई करावी अन्यथा या अधिकाऱ्यांवरच कारवाईसंबंधी न्यायलयात दाद मागाणार त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणालेत आमदार नितेश राणे

मुंबईचा पर्यटनटच्या दृष्टिकोनातून विकास झाला पाहिजे. मुंबई सुशोभित झाली पाहिजे ही भूमिका भाजपाचीही आहे. मात्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अट्टहासापायी पैशाचा गैरवापर होत असेल आणि नियम धाब्यावर बसवले जात असतील तर त्याला आमचा विरोध राहील. मुंबई महापालिकेने गिरगाव चौपाटीवर विविंग गॅलरी उभारली आहे. ही गॅलरी पर्जन जलवाहिनीवर उभारली आहे. तसेच समुद्रामध्ये पिलर्सही टाकले आहेत. त्यामुळे सीआरझेडचे कोणतेही नियम पाळलेले नाहीत. पर्यटनाच्या नावाखाली अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला हाताशी धरून जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधळपट्टी सुरू आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी एमआरटीपी अॅक्टअंतर्गत यावर कारवाई करावी नाहीतर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागले अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com