Aditya Thackeray | आरे आंदोलनात सहभागी झालेले आदित्य ठाकरे बाळ; नितेश राणेंच खोचक ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Rane Aditya Thackeray ncpcr notice to mumbai police in Thackeray  Aarey Bachao protest row

आरे आंदोलनात सहभागी झालेले आदित्य ठाकरे बाळ; नितेश राणेंच खोचक ट्वीट

मुंबई : मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला मागील काही दिवसांपासून विरोध होत आहे, यादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल या प्रकरणी आंदोलन केले होते. यावेळी अनेक नागरिकांनी देखील हजेरी लावली होती, दरम्यान आता हे आंदोलन आदित्य ठाकरे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता खोचक शब्दात त्यांच्यावरक टीका केली आहे.

आरे आंदोलनात सहभागी झालेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे बाळ असल्याच्या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. या राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या नोटीसीनंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हणाले की, "बालहक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग अद्याप लहान असलेल्या व्यक्तीला नोटीस कशी पाठवू शकतो! असा अन्याय मान्य नाही, बच्चे की जान लोगे क्या!" राणे यांनी यासोबत आयोगाने पाठवलेल्या नोटीसीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

हेही वाचा: शिवसेनेचा द्रोपदी मुर्मूंना पाठिंबा? ठाकरे दोन दिवसात घेणार निर्णय

दरम्यान आरे कारशेडच्या विरोधातील आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी नियम मोडल्याची तक्रार एका संस्थेने केली असून त्यानंतर ठाकरेंना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. काल 'आरे बचाव' हे आरे येथील जंगल वाचवण्यासाठी केलेल्या आंदोलनात अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात लहान मुलांना सहभागी होण्याची परवानगी नसताना लहान मुलांचा या आंदोलनात सहभाग होता. त्या पार्श्वभूमिवर ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

यावर सह्याद्री राईट्स या संस्थेने आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिस आणि राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केल्यावर बालहक्क आयोगाकडून मुंबई पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी तीन दिवसांत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना या नोटीसीत देण्यात आली आहे.

हेही वाचा: आयफोन 14 'या' तारखेला होणार लाँच; प्री ऑर्डरची तारीख देखील उघड

Web Title: Nitesh Rane On Aditya Thackeray Ncpcr Notice To Mumbai Police In Thackeray Aarey Bachao Protest Row

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..