Video : मुंबई-सुरत-गुवाहाटी राजकीय कोंडी कधी सुटणार? गडकरींचं खास उत्तर

त्यांच्या या उत्तरानंतर राज्यात नेमकं काय घडणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Nitin Gadkari
Nitin GadkariSakal

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असताना आता या सर्व घडामोडींवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या राज्यात जो मुंबई-सुरत गुवाहाटी अशी जी राजकीय कोंडी लागली आहे ती कधीपर्यंत सुटेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गडकरींनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तरानंतर राज्यात नेमकं काय घडणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ते झी वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. (Nitin Gadkari On Maharashtra Political Crises)

गडकरी म्हणाले की, कोंडी दूर करण्यासाठी आपल्याला पारदर्शकता आणावी लागले असे म्हणत राज्यात उद्भवलेली राजकीय कोंडी लवकरच सुटेल असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला आहे. ही कोंडी मविआ क्लिअर करेल की, ती सोडवण्यासाठी तुम्हाला जावं लागेल असे विचारलं असता ते म्हणाले की, आगे आगे देखो होता है क्या, आजच्या समस्यांमध्ये उद्याची उत्तरं लपलेली असतात. काही प्रश्नांना नैसर्गिक पद्धतीनेच सोडवणं गरजेचं असतं. लवकरच सध्या उद्भवलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. परिस्थिती निवळेल आणि आलेलं मळभ दूर होऊन नवा सूर्योदय होईल, असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला आहे. गडकरींच्या या उत्तरात अनेक प्रश्नांची उत्तरं लपलेली असून, राज्यात सत्तांतर होणार की, मविआ सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Nitin Gadkari
मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू, 'या' तारखेपर्यंत कडक बंदोबस्त

10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश

10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जमावबंदीचे कलम 144 लागू करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळं जमाव किंवा गर्दी करता येणार नाही. 10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.शिवसैनिक सध्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता आता मुंबई पोलिसांनी खबरदारीची पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत आता कलम १४४ लागू करण्यात आलं असून जमावबंदी लावण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com