नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांबद्दलचे निर्णय काय सांगतात? भाजपने काय दिले संकेत?

शिवराजसिंह चौहान यांची एक्झिट समजण्यासारखी असली तरी
Nitin Gadkari And Devendra Fadnavis News
Nitin Gadkari And Devendra Fadnavis NewsNitin Gadkari And Devendra Fadnavis News

Nitin Gadkari And Devendra Fadnavis News भाजपने बुधवारी (ता. १७) संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना केली आहे. संसदीय मंडळात मोठे बदल करीत नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि शिवराज सिंह चौहान यांना हटवले आहे. याशिवाय १५ सदस्यीय केंद्रीय निवडणूक समितीतही या नेत्यांना स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश केला आहे. याकडे महाराष्ट्र व केंद्रातील मोठा राजकीय बदल म्हणून पाहिले जात आहे.

एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची संसदीय मंडळातून हकालपट्टी करण्याकडे त्यांची पदावनती म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवेशाने त्यांच्या वाढत्या उंचीचे संकेत मिळत आहे. याआधीही गोवा, बिहारसारख्या राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्वाने बढती दिली आहे.

Nitin Gadkari And Devendra Fadnavis News
Box Office Collection : आमिर, अक्षयमध्ये जोरदार टक्कर; कोण अधिक फ्लॉप?

आता केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान देऊन फडणवीस (Devendra Fadnavis) यांची व्याप्ती आता महाराष्ट्राबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांची आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे नेते म्हणूनही घोषणा करण्यात आली आहे. परंतु, नितीन गडकरींच्या बाबतीत असे झाले नाही. ते आता फक्त केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री आहे. ते भाजपमध्ये कोणतेही पद भूषवत नाहीत किंवा ते कोणत्याही राज्याचे प्रभारीही नाही.

नितीन गडकरी हे अनेक दिवसांपासून भाजपमध्ये बाजूला असल्याचे दाखवत आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका असो किंवा यंदाच्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका. प्रचारात किंवा अन्य कोणत्याही भूमिकेत ते कुठेच दिसले नाही. संसदीय मंडळात बदल करताना त्यात एकही मुख्यमंत्री ठेवण्यात आलेला नाही, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

Nitin Gadkari And Devendra Fadnavis News
Good News For Farmers : कर्जावरील व्याजात १.५ टक्के सूट; मोदी मंत्रिमंडळाची घोषणा

नितीन गडकरींकडून प्रतिक्रिया नाही

शिवराजसिंह चौहान यांची एक्झिट समजण्यासारखी असली तरी नितीन गडकरींची एक्झिट धक्कादायक आहे. कारण, माजी राष्ट्रीय अध्यक्षांना संसदीय मंडळात सहभागी करून घेण्याची परंपरा आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना संसदीय मंडळातून वगळल्यानंतरच ही परंपरा खंडित झाली. परंतु, नितीन गडकरी हे सध्याच्या राजकारणातील सक्रिय नेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी धक्कादायक आहे. याबाबत नितीन गडकरींकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com