मुंबई-गोवा महामार्गचं काम कधी पूर्ण होणार?; नितीन गडकरींनी दिलं उत्तर

Nitin Gadkari on Mumbai-Goa highway work complition
Nitin Gadkari on Mumbai-Goa highway work complition

मागील कित्येक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa National highway) काम सुरुच असून या महामार्गाच्या बिकट अवस्थेमुळे यावर होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. यातच अखेर हे काम कधी पुर्ण केलं जाणार असा प्रश्न कितीतरी दिवसांपासून कोकणवासिय विचारत आहेत. अखेर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

रायगड रत्नागीरी आणि सिंधूदूर्ग या तिनही जिल्ह्यांसाठी जीवनवाहीनी असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचं काम नेमकं कधी पुर्ण होणार असा प्रश्न कोकणवासीय विचारत आहेत. यात नितीन गडकरी यांनी एका वर्षात या महामार्गाचं काम पुर्ण होईल असं आश्वासन दिलं आहे.

Nitin Gadkari on Mumbai-Goa highway work complition
"शरद पवारांचे नाव घेतले की…"; राज ठाकरेंच्या टिकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर

गडकरी म्हणाले की, "हा प्रकल्प तुकड्यांमध्ये अकरा पॅकेजसमध्ये सुरु आहे. याच्या दोन पॅकेजमध्ये अजूनही गडबड सुरू आहे. या रस्त्याला मीच वैतागलोय, आता त्याचे बहुतेक प्रश्न सुटले आहेत." त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, " आता बहुतेक प्रश्न सुटले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त एक वर्षाच्या आत मुंबई-गोवा या रस्त्याचं काम पुर्ण करण्याचा मी पुर्ण प्रयत्न करेल असा विश्वास तुम्हाला देतो". या दरम्यान हे आश्वासन कोकणवासियांना मिळाल्याने नितीन गडकरींची ही नवी डेडलाईन पाळून तरी हे काम पुर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Nitin Gadkari on Mumbai-Goa highway work complition
नाशिकजवळ रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले; एक प्रवाशी ठार, अनेक जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com