फडणवीसांच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन व्हावं : नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नागपूर : 'युतीचा तिढा लवकरच सुटेल व महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल. महायुतीचा निर्णय लवकरच होईल. भाजपच्या सर्वाधिक म्हणजेच 105 जागा असल्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात सरकार स्थापन व्हावं,' अशी इच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

भाजपचं ठरलं! शिवसेनेशिवाय करणार सत्तास्थापनेचा दावा 

सध्या सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून व जागावाटरावरून रस्सीखेच सुरू आहे. कोणीच तडजोड करण्यास तयार नाही. अशात गडकरींनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे सांगत या चर्चेला वेगळे वळण दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रासाठी योग्य आहे, त्यामुळे त्यांच्याच नेतृत्त्वात मंत्रीमंडळ स्थापन व्हावं असे गडकरी यांनी सांगितले. 

कालपासून गडकरी पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात येणार का, अशी चर्चा सुरू होती, यावर स्पष्टीकरण देताना गडकरी म्हणाले की, मी केंद्रिय मंत्री आहे, त्यामुळे राज्यात परतण्याचा प्रश्नच येत नाही.   

शिवसेनेला भाजपच्या कर्नाटक पॅटर्नची धास्ती; आमदारांवर विशेष लक्ष

नितीन गडकरी सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीस गेले होते. त्यानंतरही सत्तासमीकरणे बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यावर बोलताना गडकरी म्हणाले की, भागवतांचा सत्तास्थापनेशी काहीही संबंध नाही. तर काल नितीन गडकरी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनाही भेटले होते, मात्र यातही सत्तास्थापनेबाबत काही चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari speaks on Maharashtra Government formation