नितीशकुमार आज घेणार मुख्यमंत्र्यांचा समाचार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान मुंबई शहराची तुलना पाटणाबरोबर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. फडणवीस यांच्या वक्‍तव्याचा समाचार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मुंबई भेटीत घेण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

नितीशकुमार उद्या (ता. 11) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी आमदार कपिल पाटील यांचा लोकभारती हा पक्ष नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेड या पक्षात विलीन होणार आहे. 

पारदर्शकतेचा मुद्दा करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाटणा शहराबरोबर मुंबईची तुलना केली. आर्थिक पाहणी अहवालात मात्र पारदर्शकेत मुंबई शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही माहिती खोडून काढत शिवसेनेवर टीका करताना मुंबई शहराचा क्रमांक पाटणा शहराबरोबर लागतो, अशा आशयाचे विधान फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे शिवसेनेला आयतेच कोलीत मिळाले. मुंबई महापालिका निवडणुकीत बिहारी मतदारांची संख्या विचारात घेता नितीशकुमार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानावर वक्‍तव्य करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

पर्यायासाठी विलीनीकरण 
आमदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील लोकभारती हा पक्ष उद्या नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दलात विलीन होणार आहे. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे उद्या (ता. 11) दुपारी तीन वाजता होणाऱ्या लोकभारतीच्या औपचारिक बैठकीत विलीनीकरणाचा ठराव मांडला जाणार आहे. संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्‍याम रजक हे या बैठकीला निरीक्षक म्हणून हजर राहणार आहेत, अशी माहिती लोकभारतीचे महासचिव अतुल देशमुख यांनी दिली.

Web Title: Nitishkumar meet devendra fadnavis