
परभणी - राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात विरोधकांकडून केले जाणारे आरोप निराधार असून इतर कोणत्याही खात्यांतून या योजनेसाठी निधी वळविण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले. विरोधकांनी अर्थसंकल्प समजून घेतल्याशिवाय वक्तव्ये करू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.