भाजपला वगळून महाराष्ट्रात कोणतंही सरकार टिकणार नाही : सुभाष देशमुख 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

भाजपला वगळून महाराष्ट्रातील कोणतंही सरकार टिकणार नाही असं दावा, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. 

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊन महिना होत आला आहे, मात्र अद्यापही महाराष्ट्रात कोणीही सरकार स्थापन करु शकलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्थिरता असल्याचे चित्र आहे.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दरम्यान, सध्या महाशिवआघाडीची चर्चा जोर धरत असताना, 
महाराष्ट्रामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपला वगळून महाराष्ट्रातील कोणतंही सरकार टिकणार नाही असं दावा, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. 

संजय राऊत म्हणतात, हम बुरे ही ठीक है

भाजपने सध्या 'वेट अँड वॉच' ची भूमिका जरी घेतली असली तरी येणाऱ्या काळात सत्तेची चक्र कोणत्या बाजूने फिरतील याचा अंदाज घेणं तूर्तास तरी शक्य नाही. सध्या मात्र महाशिवआघाडीचे सरकार स्थापन कऱण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीमध्ये याबाबत बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत.

नव्या आघाडीचं ठरलं!

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No government will survive in Maharashtra except BJP says Subhash Deshmukh