डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपींना दिलासा नाही

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपींना दिलासा नाही

मुंबई - ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना सोमवारी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अभियोग पक्षाला दिलेल्या मुदतवाढीला विरोध करणारी याचिका आरोपींनी केली. या प्रकरणी नोव्हेंबरमध्ये सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने निश्‍चित केले.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींनी उच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. पुणे दंडाधिकारी न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. याआधीही अशी मुदतवाढ देण्यात आली असून, त्यावरील याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. अशा प्रकारे मुदतवाढ देण्याचा अधिकार विशेष न्यायालयाला आहे, असा दावा आरोपींनी केला आहे. या प्रकरणावरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे यांनी नोव्हेंबरपर्यत तहकूब केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com