
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसला मराठी तरुणांचं वावडं आहे का! कार्यकारिणीवरुन कार्यकर्ते नाराज?
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये एकही मराठी नाव नसल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचंही बोललं जातंय.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे. मात्र या नव्या कार्यकारिणीमध्ये एकाही मराठी तरुणाचं नाव नाहीये. त्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
हेही वाचाः Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये मराठी व्यक्तीचं नाव नसल्याने राष्ट्रवादीला मराठी लोकांचं वावडं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात काही पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांशी बोलले असल्याचीही माहिती आहे.
हेही वाचा: J.P. Nadda : जे.पी. नड्डा 'दर्गा'मध्ये गेल्याने वातावरण पेटलं; विरोधक म्हणाले...
परंतु अद्याप पक्षाकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काम करण्यायोग्य कार्यकर्ते महाराष्ट्रात नाहीत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.