राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

Zilla Parishad And Panchayat Samiti Nominated Members: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही मान्यताप्राप्त सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यासंबंधीचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे.
Zilla Parishad And Panchayat Samiti Nominated Members

Zilla Parishad And Panchayat Samiti Nominated Members

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच, आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये 'स्वीकृत सदस्यां'च्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विधेयक मंगळवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर जिल्हा परिषदांमध्ये २०१ नवीन सदस्यांची वाढ होईल. तर पंचायत समित्यांमध्ये ८०४ जणांना नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com