esakal | Vidhan Sabha 2019 : फडणवीस, विखेंचा अर्ज वैधच; आक्षेप फेटाळले
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : फडणवीस, विखेंचा अर्ज वैधच; आक्षेप फेटाळले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जांवर आज विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती.

Vidhan Sabha 2019 : फडणवीस, विखेंचा अर्ज वैधच; आक्षेप फेटाळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर/नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जांवर आज विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. मात्र, सविस्तर सुनावणीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व आक्षेप फेटाळत दोघांचे अर्ज वैध ठरविले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून काल (ता. 4) उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जातील माहिती अपूर्ण आहे, शपथपत्रावरील नोटरीचा शिक्का मुदतबाह्य आहे आणि शासकीय निवासस्थानावर असलेल्या थकबाकीची माहिती दिलेली नाही, अशी तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख, अपक्ष प्रशांत पवार आणि "आप'चे उमेदवार अमोल हाडके यांनी करत मुख्यमंत्र्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती. या तक्रारीवर पावणेदोन तास सुनावणी चालली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला. चुकीची माहिती असताना अर्ज मंजूर केल्याने विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवत तहसील कार्यालय परिसरात जोरदार नारेबाजी केली. 

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर; कोण कोण करणार प्रचार?

नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्राला कॉंग्रेस उमेदवाराने घेतलेला आक्षेपही निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. विखे यांच्या अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात नोटरी कायद्यानुसार त्रुटी आहेत, असा आक्षेप कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश थोरात यांनी केला होता. "विखे यांनी सादर केलेल्या शपथपत्रावर सील नाही. नोटरीचा कालावधी कधी पूर्ण होणार ते नमूद केलेले नाही. शपथपत्र दाखल करणाऱ्या व्यक्तीला ओळखणाऱ्या अन्य व्यक्तीची सही नाही. शपथपत्राची एकूण पाने नमूद केलेली नाहीत,' असे आक्षेप थोरात यांनी घेतले होते. 

Vidhan Sabha 2019 : मतदारसंघ 21 अन् उमेदवार 373!

मात्र, शपथपत्रात दाखल केलेली माहिती योग्य आहे, एवढाच एकमेव मुद्दा महत्त्वाचा आहे. नोटरी कायद्यान्वये याबाबतची खातरजमा करण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. उमेदवारी अर्जावर त्या आधारे आक्षेप घेता येणार नाही, असा दावा विखे यांच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विखे यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. यामुळे या मतदारसंघातून विखे, थोरात यांच्यासह सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.