esakal | Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर; कोण कोण करणार प्रचार?
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 congress announces 40 star campaigners list Maharashtra election

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर; कोण कोण करणार प्रचार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी अध्यक्ष राहूल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण,  प्रथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार, माजी खासदार नाना पटोले आदींसह ४० जणांचा यामध्ये समावेश आहे.

ब्राह्मण महासंघाने भूमिका बदलली; चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा

काँग्रेस पुढे आव्हान
राज्यात सध्या काँग्रेस अतिशय बिकट अवस्थेतून जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक नेते आणि संभाव्य उमेदवार भाजप आणि शिवसेनेत गेले आहेत. या परिस्थितीत विजय खेचून आणण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करून अतिशय समंजसपणे  जागा वाटप करून घेतले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेली ईडीची नोटीस, अजित पवार यांचे राजीनामा नाट्य या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेस गेल्या काही दिवसांत अतिशय शांत होती. काँग्रेसची राज्यातील निवडणुकीची जबाबदारी युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर आहे. त्याच्याबरोबरीनेच राहुल गांधी, सचिन पायलट, प्रियंका गांधी यांच्यासारखे नेते प्रचारात सक्रीय सहभागी होणार असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरूप वाढणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर देशमुख, पवारांचा आक्षेप

काँग्रेसचे स्टार प्रचारक असे
सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, प्रियंका गांधी-वड्रा, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अशोक गेहलोत, कमलनाथ, भुपेश बघेल, मुकूल वासनिक, अविनाश पांडे, राजीव सातव, रजनी पाटील, सचिन पायलट, शत्रुघ्न सिन्हा, नगमा मोरारजी, विजय वडेट्टीवार, मधूकर भावे, नाना पटोले, आर. सी. खुंटिया, माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड, सचिव सावंत, हुसैन दलवाई, नसीम खान, बसवराज पाटील मुरूमकर, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमर राजूरकर, सुशमिता देव, कुमार केतकर, चारुलता टोकस, उदित राज, नदीम जावेद.

loading image
go to top