राज्यात धावणार एसटीच्या नॉन एसी स्लीपर बस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मुंबई - "विनावातानुकूलित स्लीपर (नॉन एसी स्लीपर) बसची नोंदणी आणि वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाला शासनामार्फत आधीच परवानगी देण्यात आली आहे, अशी परवानगी खासगी वाहनांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबतीत एसटी महामंडळाचा एकाधिकार असून लोकांच्या सेवेत लवकरच एसटीच्या विनावातानुकूलित स्लीपर बस दाखल होतील, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. 

राज्यात विनावातानुकूलित स्लीपर बसेसच्या नोंदणीला संमती नाही. तथापि, एसटी महामंडळाच्या बाबतीत मात्र ही अट दूर करण्यात आली असून, शासनाने महामंडळास या संदर्भातील नियमामध्ये सूट दिली आहे. राज्यात विनावातानुकूलित स्लीपर बसची नोंदणी करण्यास, तसेच या बसेस चालविण्यास राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फत महामंडळास परवानगी देण्यात आली आहे. रावते म्हणाले, की महामंडळामार्फत लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात राज्यभर चालविल्या जातात. लोक रात्री प्रवास करण्यास एसटीच्या गाड्यांना प्राधान्य देतात. सध्या असलेल्या बहुतांश गाड्यांमधून बसून प्रवास करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी गैरसोय होते. त्यामुळे एसटीमध्ये स्लीपर कोच गाड्या आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काही वातानुकूलित स्लीपर (एसी स्लीपर) बस महामंडळाच्या ताफ्यात दाखलही झाल्या आहेत. पण सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने आणि त्यांना किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी विना वातानुकूलित स्लीपर (नॉन एसी स्लीपर) बस महामंडळाच्या ताफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

Web Title: non-AC sleeper bus in the state