esakal | भाजपविरहित सरकार स्थापन होणार; हालचालींना वेग
sakal

बोलून बातमी शोधा

Non BJP government may formed in maharashtra

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा वाढत चाललेला असताना भाजपविहित सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना मुंबईत वेग आला आहे. काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक झाली असून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

भाजपविरहित सरकार स्थापन होणार; हालचालींना वेग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा वाढत चाललेला असताना भाजपविहित सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना मुंबईत वेग आला आहे. काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक झाली असून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षपद जाणार

काँग्रेस नेत्यांची विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली असून या बैठकीला नांदेडवरून अशोक चव्हाण, चंद्रपूरहून विजय वडेट्टीवार, नागपूरहून नितीन राऊत बैठकीला दाखल झाले आहेत. तसेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम, खासदार हुसेन दलवाई, आमदार अमित देशमुख आदी या बैठकीत उपस्थित आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस आमदारांच्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा झाली आहे. राज्यातल्या नेत्यांशी आणि आमदारांशी या बैठकीत चर्चा करून दिल्लीत हायकमांडला काँग्रेस नेते प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोठ्या भावाकडून छोट्या भावाचा खून; आरोपीस 12 तासात अटक

दरम्यान, भाजपने सेनेला दिलेलं आश्वासन पाळलं नाही. भाजप सेनेला जनतेने कौल दिला असला तरी राज्यातील सत्तेत भाजप नसावे अशीच काँग्रेसची भूमिका आहे. परंतु काँग्रेस पक्षाने अजून याबात अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, याला कानाडोळा करताना आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला असल्याचे मत व्यक्त करताना आम्ही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील नसल्याचे सांगितले आहे.

loading image