मलिकांचा राजीनामा नाहीच; मुंबई NCPचं अध्यक्षपद राखी जाधवांकडे?

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं कळतंय
Nawab Malik ED Custody Increased
Nawab Malik ED Custody Increasede sakal
Updated on

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची (Mumbai NCP) सध्या बैठक सुरु आहे. या बैठकीत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय झाला आहे. पण मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद जे मलिक यांच्याकडे आहे ते नगरसेविका राखी जाधव (Rakhi Jadhav) यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (not any decsion on resignation of Nawab Malik Rakhi Jadhav will be Mumbai NCP president)

Nawab Malik ED Custody Increased
100 रुपयात बघा 'काश्मिर फाईल्स'; नितेश राणेंची विद्यार्थ्यांना ऑफर

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या तासाभरापासून सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यामध्ये नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली. तसेच नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मुंबईच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे सोपवण्याची चर्चाही यावेळी झाली.

Nawab Malik ED Custody Increased
मंत्रीपदं भोगताना तुमचा विचार कुठे होता? G23 वर संतापले अधीर रंजन चौधरी

कोण आहेत राखी जाधव?

राखी जाधव या मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नटनेत्या आहेत. घाटकोपरमधून त्या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या त्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात.

राष्ट्रवादीच्या बैठकीतील मुद्दे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये पाच महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार होती. यामध्ये नवाब मलिकांच्या खात्यांचा पदभार कोणाकडे द्यायचा?, पेनड्राईव्ह प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती काय असेल?, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात रणनीती, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर होणार चर्चा, मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षकाची नियुक्ती यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com