नोटाबंदी म्हणजे चौथा दुष्काळ - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

माळाकोळी (जि. नांदेड) -""राज्यात सतत तीन वर्षे दुष्काळ पडला. शेतीत काहीच पिकले नाही, त्यामधूनही सावरलेल्या शेतकऱ्यांना यंदा पाऊसकाळ बरा झाल्याने पिकेही बरी आली; परंतु नोटाबंदीच्या स्वरूपाने सरकारने शेतकरी बांधवांच्या माथी चौथा दुष्काळ मारत शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले,'' असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे वीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. शेतीमालाच्या भावात नोटाबंदी अगोदर आणि नोटाबंदीनंतर मोठी तफावत पाहायला मिळते. कापूस, सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा फारच कमी आहेत. विदर्भात संत्र्याचे भाव पडलेत, कांद्याचे वांदे आहेतच, नोटाबंदीनंतर मजुरी व शेतीकाम बंद करून शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागले, खते बियाणे घेण्याची अडचण शेतीत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्याची अडचण यामुळे शेतकरी, शेतमजूर यांचे वीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष पॅकेजची आमची मागणी आहे.'' 

""नोटाबंदीच्या रांगेत मृत्यू झालेल्यांना हुतात्म्याचा दर्जा देऊन मदत करण्यात यावी, अशा मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. मात्र, त्यांना शेतकऱ्यांची कदर नाही. आचारसंहितेच्या काळात कोणताही निर्णय होऊ शकत नाही हे माहीत असूनही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निवेदन देणे म्हणजे शिवसेनेची नौटंकी आहे,'' अशी टीकाही त्यांनी केली. 

""सरकारमध्ये अडीच वर्षांपासून मांडीला मांडी लाऊन बसणाऱ्या शिवसेनेला निवडणुकीतच शेतकऱ्यांचा पुळका कसा आला हे न समजण्याइतपत अडाणी कोणी नाही,'' असे ते म्हणाले. कॅशलेस व्यवस्था सामान्य माणूस व शेतकरी कसा वापरू शकतो? शेतमजुरी कॅशलेस कशी द्यायची? गायी म्हशी विकत कशा घ्यायच्या? असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले.

Web Title: Notabandi the fourth drought