"केवळ नोटाबंदीमुळे झाले शेतकऱ्यांचे नुकसान"

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई : केंद्राने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर उतरले आहेत, अशी आकडेवारी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, केवळ नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोबीला ऑक्टोबर महिन्यात प्रति क्विंटल 611 रुपयांचा भाव मिळाला होता. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 575 रुपयांवर आला. त्याचप्रमाणे वांग्यांचा क्विंटलमागे भाव 2,663 रुपयांवरुन 1,018 रुपयांवर पोचला. नोव्हेंबरमध्ये फ्लॉवरला प्रति क्विंटल अवघा 814 रुपयेएवढा भाव मिळाला. ऑक्टोबरमध्ये आडतदारांनी 1,316 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे फ्लॉवरची खरेदी केली होती. 

यंदा मॉन्सून चांगला झाला. त्याचप्रमाणे, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी दुसरी पिके घेण्याच्या योजनेला प्रतिसाद मिळत होता. परंतु केवळ नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. 
 
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या मासिक अहवालात नोंदणीकृत आडतदारांच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदीचा भाव दिला जातो. या आडतदारांकडून किरकोळ भाजी विक्रेते आणि घाऊक खरेदीदारांना भाज्यांचा पुरवठा केला जातो. 

Web Title: note ban incurs huge loss to farmers, affects agriculture produce badly