नवनीत राणांची तक्रार, राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश|Navneet Rana Complaint To Loksabha Speaker | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana Complaint To Loksabha Speaker

नवनीत राणांची तक्रार, राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश

मुंबई : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या हक्कभंग नोटीशीनंतर राज्यातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहेत. अमरावती (Amravati) आणि मुंबईचे (Mumbai) पोलिस आयुक्त आणि राज्याचे पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलला दिल्लीत लोकसभा सचिवालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: 'मी वरून चौकशी लावणार..' आयुक्तांनी भेटायला नकार दिल्यानंतर नवनीत राणा संतापल्या

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत द्यावी आणि शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावं, अशी मागणी करत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील मोर्शी येथे आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यांना दिवाळी कारागृहात काढावी काढली. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन देण्याचे ठरवले होते. मात्र, कोरोनाचा काळ असल्यानं राणा दाम्पत्याला घरातच स्थानबद्ध करण्यात आलं. अर्ध्या रात्री पोलिस माझ्या घरी आले आणि तुम्हाला फरफटत नेऊ, अशी धमकी दिली. त्यानंतर आम्हाला पोलिस घेऊन गेले आणि पोलिस आयुक्त कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसविण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. एका लोकप्रतिनिधीचा अपमान केला, अशी तक्रार राणांनी संसदेत केली होती.

शाई फेक प्रकरणी कोणतीही चूक नसताना आणि आमदार रवी राणा दिल्लीत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत आम्ही अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग यांना विचारले असता त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांचे आदेश असल्याचं सांगितलं होतं, असं नवनीत राणा लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव मांडल्यानंतर माध्यमासोबत बोलतांना सांगितलं. त्यानंतर आज अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग, पोलिस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहावे लागणार आहे. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

Web Title: Notice To Police Officers In Maharashtra After Navneet Rana Complaint To Loksabha Speaker Om Birla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..