'मी वरून चौकशी लावणार..' आयुक्तांनी भेटायला नकार दिल्यानंतर नवनीत राणा संतापल्या

navneet rana
navneet rana

अमरावतीत गेल्या महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यावरून वादंग सुरू आहे. स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांनी पुतळा बसलवा की मनपा आयुक्त त्यावर कारवाई करत पुतळा हटवतात. संबंधित पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं. तर राणा यांनी हा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असल्याचं सांगत पुतळा बसवणारच, या भूमिकेवर कायम आहेत. (Navneet Rana alleges Uddhav Thackeray over Shivaji Maharaj Statue)

या दरम्यान, पालिका आयुक्तांवर शाई टाकण्याचा प्रकार घडला. काही महिलांनी हे केल्याचं समोर आलं. हे कार्यकर्ते राणा कुटुंबीयांचे समर्थक असल्याचं समोर येत आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं राणा यांनी म्हटलं. यानंतर आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी वेळ देण्यास नकार दिल्याचं समोर आलं. (Navneet Rana News)

त्यामुळे या प्रकरणाची वरून चौकशी लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं. आयुक्तांवर शाई फेकण्याच्या प्रकरणात युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा आरोप काहींनी केला आहे. मात्र या प्रकरणाशी माझा संबंध नसून मला अडकवण्याचं कारस्थान असल्याचं राणा यांनी म्हटलंय.

navneet rana
नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘मला विचारून लफडा केला का?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. (Municipal Commissioner of Amravati) या प्रकरणात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह १० जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावर माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून मला यात जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता. आता यानंतर नवनित राणा (navneet rana) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मी दिल्लीत असल्याने याकडे लक्ष्य द्यायला वेळ नव्हता. मात्र, लवकरच यासंबंधी पोलीस आयुक्तांना भेटणार आहे.

navneet rana
ठाकरे सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात - नवनीत राणा

काय म्हणाल्या नवनीत राणा?

  • शाई फेकरणारे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आहेत.

  • ते शिवाजी महाराजांचे मावळेच होते.

  • स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा कट केल्याचा आरोप केला

  • एवढा मोठी गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांच्या पाठिशी

  • आम्ही वरपर्यंत याची चौकशी लावणार

  • कमिशनर वरही चैकशी लावणार

  • हातात काही न लागल्यानंतरही गुन्हा दाखल कऱण्यात आला

  • पालकमंत्र्यांच्या बोलण्यावर आणि मुख्यमंत्र्यांच्या फोनवर गुन्हा दाखल झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com