Ajit Pawar : आता मी म्हटलं का माझ्या काकाला जाणता राजा म्हणा? दादांचा पत्रकारांनाच उलट प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : आता मी म्हटलं का माझ्या काकाला जाणता राजा म्हणा? दादांचा पत्रकारांनाच उलट प्रश्न

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाषणावर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी काहीच चुकीच बोललो नाही. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर अजित पवार यांना पत्रकाराने एक प्रश्न केला की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही जाणता राजा म्हणतात यावर भाजप आक्षेप घेतो. पत्रकाराच्या या प्रश्नावर अजित पवार यांनी अगदी मिष्किलपणे उत्तर दिलं आहे.

अजित पवार म्हणाले की, आता मी म्हटलं का माझ्या काकाला जाणता राजा म्हणा? काय बोलतो राव. मी म्हणालो का की माझ्या काकाला तुम्ही जाणता राजा म्हणा. ज्यांनी तो शब्द प्रयोग केला त्याला जाऊन विचारा. आम्हाला कशाला विचारता? असं अजित पवार म्हणाले आहेत.

संभाजी महाराजांच्या वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार?

मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते हे पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा स्वतंत्र्य अधिकार असतो.

हेही वाचा: अजित पवारांविरुद्ध आंदोलना आधीच भाजप आमदार, खासदारांचा फोन? सांगितला किस्सा

इतिहासाच्या आधारावर विधानसभेत बोललो. संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणायला हवं. मी माझी भूमिका मांडली. ज्यांना योग्य वाटलं त्यांनी स्विकारावं. कुणी धर्मवीर म्हणेल तर तो त्यांचा प्रश्न. स्वराज्यात सगळ्या जाती धर्माचे लोकं. अनेकांनी स्वतःला धर्मवीर म्हणून घेतलं. असा टोमणा अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

हेही वाचा: Ajit pawar: मी कधीही चुकीच बोललो नाही; 'त्या' वक्तव्यावर अजित पवार ठाम

तसेच राज्यपालांविरोधात भाजप गप्प का? असं मी कोणता गुन्हा केला आहे. असं मी काय चुकीच महाराजांबद्दल काय बोललो. असा सवालही पवार यांनी उपस्थित केलाआणि माझा राजीनामा मागणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. असही पवार यावेळी म्हणाले. स्वराज्याच्या रक्षणात सर्व काही आलं. स्वराज्यरक्षक म्हणणं हेच संभाजी महाराज यांना न्याय देणार. द्वेषाचं राजकारण मला मान्य नाही. सूडबुद्धीने राजकारण केलं जात आहे. असा आरोप पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

वादग्रस्त विधान मी केलेलं नाही. मी माझ्या विधानाशी ठाम आहे. वादग्रस्त विधान राज्यपाल, भाजप नेत्यांनी केलं आहे. मी शरद पवार यांच्याशी सहमत आहे. आंदोलन करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावं. मी वादग्रस्त विधान केलं नाही. हे सर्व घडवणाला मास्टरमाईंडी त्यावेळी विधानसभेत नव्हता.

टॅग्स :Sharad PawarAjit Pawar