दृष्टिहीनांसाठी आता नोटा ओळखणे सोपे!

दृष्टिहीनांसाठी आता नोटा ओळखणे सोपे!

मुंबई : दृष्टिहीन व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्यात, यासाठी रिझर्व्ह बॅंक मोबाईल ऍपची निर्मिती करणार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने शुक्रवारी (ता. 22) उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती देण्यात आली. 

"नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड' या संस्थेने केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली. रिझर्व्ह बॅंकेने चलनात आणलेल्या नव्या नोटा दृष्टिहीनांना ओळखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. याबाबत रिझर्व्ह बॅंकेने प्रतिज्ञापत्र दाखल केले.

याचिकाकर्त्यांच्या मागणीबाबत रिझर्व्ह बॅंकेने सहमती व्यक्त केली आहे. याबाबत चारसदस्यीय तज्ज्ञ समितीही नेमली होती. अंध व्यक्तींना नोटा ओळखण्यासाठी एखादे उपकरण किंवा यंत्रणेपेक्षा मोबाईल ऍप अधिक उपयुक्त आणि सुलभ ठरेल, अशी शिफारस या समितीने पाहणीनंतर केली. ही शिफारस मान्य करून पुढील कार्यवाही सुरू केल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले. या प्रक्रियेसाठी आणखी काही महिने लागू शकतात, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले. याचिकाकर्त्या संस्थेनेही दरम्यानच्या काळात तज्ज्ञांच्या मदतीने अशी एखादी यंत्रणा उभारण्याचा विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. 

आकारातील साम्यामुळे संभ्रम 

पूर्वी वापरात असलेल्या नोटा ओळखणे वैविध्यपूर्ण आकारांवरून शक्‍य व्हायचे. सध्याच्या अनेक नोटा लहान आणि समान आकाराच्या असल्याने संभ्रम निर्माण होतो, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com