आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची नजर

आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची नजर

मुंबई : रेल्वे प्रवास भीतीविरहित आणि उपद्रवमुक्‍त करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, याअंतर्गत लोकलचे सर्व डबे, मेमू आणि डेमूमध्येही सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या तब्बल दहा हजार 349 डब्यांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्यासाठीच्या 356 कोटींच्या खर्चाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनंसपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी ही माहिती दिली. 

या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सध्या पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सुरवातीच्या टप्प्यात मुंबईच्या लोकलमधील महिलांच्या डब्यात हे कॅमरे बसवले जाणार आहेत. मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर सीसी टीव्ही आहेत. महिलांच्या केवळ 25 डब्यांमध्ये सीसी टीव्ही बसविले आहेत. महिलांवर होणारे वाढते हल्ले लक्षात घेऊन महिलांच्या डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय 2017 च्या सप्टेंबरमध्ये घेण्यात आला होता; मात्र त्याची अद्याप काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. 

मुंबई उपनगरीय मार्गांवरील लोकलबरोबरच दिवा ते रोहा, दिवा ते वसई मार्गांवर धावणाऱ्या मेमू गाड्या आणि पुणे-लोणावळा लोकल व नागपूरसह मध्य रेल्वे मार्गांवरील सर्व डेमू गाड्यांच्या डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. टाटा समाज विज्ञान संस्थेने काही वर्षांपूर्वी लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले होते. 

चेहरा स्पष्ट ओळखता येणार 

सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अनेक वेळा संशयित व्यक्तीचा चेहर स्पष्ट दिसत नाही; मात्र नव्या तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे आणण्याचा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा दलाकडून पाठविला जाण्याची शक्‍यता आहे. त्यात स्वयंचलित पद्धतीने डब्यातील जास्तीत जास्त व्यक्तींचा चेहरा स्पष्ट दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com