आता शेतकरीही करू लागलेत संशोधन!

आता शेतकरीही करू लागलेत संशोधन!

अकोला : शेतकरी म्हटले की, कुर्ता-धोतर, टोपी, मळकट कपडे आणि फाटलेल्या चपला अशी प्रतिमा सर्वांच्या नजरेसमोर येते. मात्र, आता यंत्र निर्मितीपासून ते नवीन वाण विकसित करणारा संशोधक म्हणून शेतकऱ्याने ख्याती प्राप्त केली आहे. शेतकऱ्यांच्या संशोधनावर प्रसिद्धी माध्यमांसह सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत असून, अशा संशोधनाची उपयोगिताही वाढत चालली आहे.

कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संंशोधन केंद्र, कृषी महाविद्यालये, बीज प्रक्रिया केंद्र, बीज निर्मिती केंद्र, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या व इतरही बऱ्याच शासकीय, निमशासकीय व खासगी विभागांमध्ये कृषी विषयक संशोधन केले जाते. विकसित संशोधनाचा प्रचार-प्रसार व अवलंब व्हावा यासाठी विशेष यंत्रणा कार्य करते. तरीही या विभागांद्वारे निर्मित संशोधन सर्वत्र उपयोगात येत नाही किंवा प्रत्येकापर्यंत त्याची माहिती पोचत नाही. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवातून, प्रयोगशिलतेतून व कमी खर्चात अधिक फायद्याचे यंत्र, वाण उपकरणे विकसित केले आहेत.

सोशल मीडियावर त्यांचे भरपूर कौतुकही होत आहे आणि प्रसिद्धी माध्यमांकडूनही त्यांची दखल घेताना दिसत आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची दखल घेऊन शासनाद्वारे कित्येकांना पुरस्कृतही करण्यात आले आहे. त्यातूनच अशा संशोधक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत असून, त्याचा लाभ कृषी विकासासाठी होत आहे.

शेतकऱ्यांचे संशोधन

सायकलवर चालणारे फवारणी यंत्र, पेरणी यंत्र, सोंगणी-मळणी यंत्र, डवरणी-खुरपणी यंत्र, विना वीज गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने पाणीपुरवठा, हवेवर चालणारे स्वयंचलित यंत्रे, सौर उर्जेवर चालणारे कृषी यंत्रे, वन्यप्राण्यांना घाबरविणारे स्वयंचलित सौर यंत्र, पक्षांना घाबरविणारे हवेवर चालणारे स्वयंचलित यंत्र, खते देणारे यंत्र, इत्यादी यंत्रे शेतकऱ्यांनी घरगुती, टाकाऊ तसेच अत्यल्प खर्चात विकसित केली आहेत. यंत्रनिर्मितीसोबतच शेंगीमध्ये सात ते आठ दाने असणारी तुरीचे वाण, विनाखर्च एकरी 10 ते 20 क्विंटल उत्पादन देणारे कापूस वाण, अधिक उत्पादन देणारे मिरची वान, संत्रा, मोसंबी, लिंबू वाण शेतकऱ्यांनी विकसित केले आहेत.

पुरक व्यवसायातून जगभरात लौकीक

काही शेतकऱ्यांनी मोत्याची शेती, मधुमक्षी, कुक्कुट, शेळी, मेढी, वराह, शहमृग, ससे, मत्स्यपालन व्यवसायात प्रयोगशीलतेतून जगभरात प्रसिद्धी प्राप्त केली आहे. त्यांच्यापैकी बरेच शेतकरी तर इतरांनाही प्रशिक्षित करून शिक्षकाची भूमिका बजावत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com