
आता घरं रिकामी करा अन्...; आव्हाडांचं BDD चाळीबाबत ट्वीट
मुंबई : मुंबईतील BDD चाळीतील (BDD Chwal) निवृत्त पोलिसांच्या कायम स्वरुपी घराबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठी घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे. त्यानुसार संबंधित चाळीतील निवृत्त पोलिसांना येथे 50 लाखांऐवजी 25 लाख रुपयांत घरं देण्यात येणार असल्याचं आव्हाडांनी नमुद केले आहे. (BDD Chwal News In Marathi)
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हंटलय की, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी (Uddhav Thackeray) आणि माझे नेते शरद पवारसाहेब (Sharad Pawar) ह्यांच्या सल्ल्यानुसार BDD चाळी तील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी घर (Home) नावावर करून देण्यात आले. आता ती घर 50 लाख ऐवजी 25 लाख रुपयात देण्यात येतील. आता घर रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्यात. #24तास_जनतेसाठी असे आव्हाडांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा: 'बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्या...'; एकनाथ शिंदेंकडून नवा व्हिडीओ ट्वीट
BDD चाळींना मिळणार बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचं नाव
काही दिवसांपूर्वी मुंबईतील बीडीडी चाळींच्या नामकरणाबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानुसार वरळीतील बीडीडी चाळ बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ शरद पवार नगर तर ना. म. जोशी बीडीडी चाळ आता राजीव गांधी नगर या नावाने ओळखली जाणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या नामकरणाची घोषणा केली होती. त्यानंतर अखेर या नामकरणासंबंधीता शासन निर्णय जारी करण्यात आला. (Mumbai BDD Chawal News)
हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: ३८ आमदारांनी मविआचा पाठिंबा काढला; शिंदे गटाचा दावा
दरम्यान, मुंबईतील बीडीडी पोलीस वसाहतीत (Police Quarter) अनेक कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकारने निर्णय घेत पोलिसांना हे घर 50 लाख रुपये बांधकाम खर्चात मिळेल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. परंतु यावरुन राजकारण सुरु झाले होते. त्यानंतर आव्हाडांनी आज निवृत्त पोलिसांना बीडीडी चाळीत 50 लाखांऐवजी केवळ 25 लाखात घरं देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पोलिसांच्या घराचं प्रश्न कायमचा मिटला आहे.
Web Title: Now Retired Police Get Home In Just 25 Lakh At Bdd Chawl Says Jitendra Awhad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..