NSE Phone Tapping Case : संजय पांडे यांना 9 दिवसांची ईडी कोठडी
NSE Phone Tapping Case : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी पोलिस आयुक्तांना मंगळवारी अटक केली. त्यानंतर NSE फोन टॅपिंग प्रकरणी अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय पांडे यांना अटक करण्यात आली असून आता त्यांना 9 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे.
यापूर्वी 18 जुलै रोजीही सीबीआयने संजय पांडे यांची चौकशी केली होती. ईडीने संजय पांडे यांना अटक करण्यापूर्वी त्याच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. याशिवाय सीबीआयनेही या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. या प्रकरणात माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याशिवाय इतरही अनेक हायप्रोफाईल लोकांची नावे समोर आली आहेत. या यादीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णा यांच्या नावाचाही समावेश आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी संजय पांडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक होते. यानंतर एप्रिल 2021 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने त्यांना महाराष्ट्राच्या DGP पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली, मात्र IPS रजनीश सेठ यांना महाराष्ट्राचे DGP बनवल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. नंतर त्यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात आले. 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे 30 जून रोजी पोलिस सेवेतून निवृत्त झाले आहेत.
2010 आणि 2015 दरम्यान, iSec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE च्या सर्व्हर आणि सिस्टम सुरक्षेशी संबंधित एक कॉंट्रॅक्ट देण्यात आले होते. या प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडी संजय पांडे यांची चौकशी करत आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडी त्याची चौकशी करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.