सुटीतही मिळणार पोषण आहार

संतोष सिरसट
शनिवार, 22 डिसेंबर 2018

सोलापूर - राज्यात यंदा तीव्र दुष्काळ पडला आहे. या दुष्काळातून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आता सुटीच्या कालावधीतही दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणे शिक्षण विभागाने शाळांना बंधनकारक केले आहे. 

सोलापूर - राज्यात यंदा तीव्र दुष्काळ पडला आहे. या दुष्काळातून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आता सुटीच्या कालावधीतही दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणे शिक्षण विभागाने शाळांना बंधनकारक केले आहे. 

केंद्र शासनाच्या दुष्काळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील विद्यार्थ्यांना सुटीच्या काळातही शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यास सांगितले आहे. राज्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. शासनाने खरीप हंगामात राज्यातील १५१ तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप सुटीच्या कालावधीतही करण्याच्या सूचना राज्यातील प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक सुनील चौहान यांनी दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यांतील महसूल यंत्रणेशी संपर्क साधून त्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची यादी मिळवावी. त्याचबरोबर त्या गावामध्ये असलेल्या शाळेतील विद्यार्थी संख्या किती आहे, याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालनालयाकडे पाठविण्याच्या सूचना चौहान यांनी दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी...
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे, पौष्टिक आहार देणे आवश्‍यक असल्याच्या सूचना आहेत. यासाठी दररोज विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये खर्च करण्यासही मान्यता दिली आहे. एका आठवड्यासाठी एका विद्यार्थ्याला १५ रुपये खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Web Title: Nutrition diet for the holidays