
मुंबई - गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने विशेषतः भाजपने ओबीसी वर्गावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. यातूनच तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरव, सुतार, नाभिक, रामोशी, लोहार, शिंपी, लेवा पाटीदार, गुजर, लिंगायत अशा तब्बल १९ ओबीसी वर्गातील समाजातील नेत्यांच्या बैठका घेत या जातींसाठी १९ महामंडळे स्थापन केली.