"नाणार' महाराष्ट्राबाहेर जाता कामा नये - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे परिसरातील गावे तसेच शेतीचे मोठे नुकसान होणार असल्यास त्याची जागा बदलली जाऊ शकते. राज्यात इतरत्र कुठेही तो उभारला जाऊ शकतो; पण देशातील हा सर्वांत मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प राज्याबाहेर जाता कामा नये, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 

नाणार प्रकल्पबाधित गावांतील कृती समितीच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावांचा 10 मे रोजी दौरा करणार आहे. या प्रकल्पामुळे शेतजमीन, वनसंपदा व गावांचे किती नुकसान होईल, याचा आढावा घेईन. प्रकल्पामुळे स्थानिकांचे होणारे नुकसान, कोकणातील पर्यटन व्यवसाय व पर्यावरणावर त्याचा किती परिणाम होईल, याचा विचार करून हा प्रकल्प नाणारमध्ये व्हावा की नाही, याबाबत पक्षाची भूमिका जाहीर करेन, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

Web Title: Oil purification project to be constructed at Nanar should not go out of Maharashtra