ओला कंपनीची मुजोरी कायम 

file photo
file photo

मुंबई ः ओला कंपनीने आता ओला वाहनचालकांकडून 30 टक्के कमिशन वसुली सुरू केली आहे. सुरुवातीला वाहनचालकांकडून 10 टक्के कमिशन घेतले जात होते. त्यानंतर आता प्रवाशांचा ओला सेवेला प्रतिसाद मिळत असल्याने ओला कंपनीने अचानकच या कमिशनमध्ये वाढ केल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

खासगी ओला, उबेर सेवेने राज्यातील बड्या शहरांमध्ये खासगी प्रवासी सेवा सुरू केली; मात्र या सेवेला अद्यापही राज्य शासनाची मान्यता नाही. सुरुवातीला यापैकी ओला कंपनी वाहनचालकांकडून प्रत्येक फेरीमागे 10 टक्केच कमिशन घेत होती. त्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगारसुद्धा या वाहनसेवेकडे वळले होते. पर्यायी अनेकांनी बॅंकांकडून कर्ज घेऊन गाडी विकत घेत, ओला सेवेत उतरले होते. प्रत्येक फेरीच्या भाड्यावर 10 टक्के कमिशन कंपनी; तर 90 टक्के भाडे वाहनचालकांना मिळत होते; मात्र आता, या सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, कंपनी या वाहनचालकांकडून तब्बल 30 टक्के कमिशन घेत आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक आपल्या गाड्या या सेवेतून काढून घेत असल्याचे वाहनचालकांकडून सांगितले जात आहे. 


जीएसटीदेखील कमिशनमधूनच... 
वाहनचालकांकडून या 30 टक्के कमिशनमध्ये जीएसटीसुद्धा घेतला जात आहे. त्यामुळे लांब पल्ल्यावर धावणाऱ्या ओला कंपनीच्या वाहनचालकांना 30 टक्के कमिशन ओला कंपनीला द्यावे लागत असल्याने प्रवास भाडे परवडत नसल्याचे वाहनचालक सांगतात. त्याचा फटका प्रवाशांनासुद्धा बसण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात ओला कंपनीशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र कंपनीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 


ओला, उबेर या दोन्ही सेवा अद्याप शासनाच्या सिटी टॅक्‍सी मोटार वाहन कायद्याअंतर्गत नाहीत. त्यामुळे या कंपन्या अशीच मुजोरी करणार आहेत. त्याचा त्रास चालकांना आणि प्रवाशांनासुद्धा होणार आहे. 
- ए. एल. क्वॉड्रोस, अध्यक्ष, टॅक्‍सी मेन्स संघटना 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com