App-Based Taxi strike : राज्यात ओला, उबर आणि रॅपिडोसह अॅप-आधारित टॅक्सी आणि बाईक-टॅक्सी चालकांनी आज एक दिवसाचा संप पुकारला आहे, ज्यामुळे मुंबई आणि पुण्यासह अनेक शहरांमध्ये प्रवासात मोठा अडथळा येऊ शकतो. चालक संघटनेच्या मुख्य मागण्यांमध्ये निश्चित आणि प्रमाणित भाडे रचना, सामाजिक सुरक्षा आणि विमा लाभ यांचा समावेश आहे. शिवाय, त्यांनी कॅब चालकांच्या उत्पन्नात घट झाल्याचे कारण देत मनमानी खाते बंद करणे आणि बाईक टॅक्सींवर बंदी घालणे या विरोधात ठोस निर्णय घेण्याची मागणी केल्या घालण्याची मागणी केली आहे.