बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी अमरावतीत दंगलखोर मोकाट अन् हिंदूवर कारवाई - भाजपा | Bjp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दंगलखोर मोकाट अन् हिंदूवर कारवाई - भाजपा

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दंगलखोर मोकाट अन् हिंदूवर कारवाई - भाजपा

- सुशांत सावंत

मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज नववा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाच्या निमित्ताने बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक (Shivsena) मोठ्या संख्येने शिवाजी पार्क येथे येत आहेत. शिवसेनेप्रमाणे भाजपामध्येही (Bjp) बाळासाहेब आणि त्यांच्या विचारांना मानणारे नेते, कार्यकर्ते आहेत. आज बाळासाहेबांच्या नवव्या स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहताना भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अमरावती दंगलीवरुन (Amravati violence) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

"आज बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी महाराष्ट्रात अमरावतीमध्ये दंगलखोर मोकाट अन् हिंदूवर कारवाई सुरु आहे" असे केशव उपाध्ये यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. आमचे "हिंदुत्व शेंडीजानव्याचे नाही असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी आहे, हे अमरावतीत सिध्द झाले" अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.

हेही वाचा: विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता NCP पॅनेलला मत द्या : शिवेंद्रसिंहराजे

मागच्या आठवड्यात त्रिपुरात मशिदीमध्ये नासधूस झाली म्हणून अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्यानंतर अमरावतीत भाजपाचे पुकारलेल्या बंदमध्येही अशाच प्रकार हिंसाचार, तोडफोड झाली होती.

हेही वाचा: एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांना 24 तासांचं 'अल्टिमेटम'

काल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले....

"सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले होते. हा पोलरायझेशनचा प्रयोग आहे. निवडून निवडून हिंदुंची दुकान तोडली, जाळली. त्यावर कोणी बोललं का? ज्यावेळी हिंदुंची दुकानं जाळली गेली, त्यावर महाविकास आघाडीचा एकतरी नेता बोलला का? मविआ नेत्यांची तोंड शिवली होती का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

loading image
go to top