Jobs
Jobsesakal

वर्षभरात दीड लाख जणांना मिळाली नोकरी; नवाब मलिक यांची माहिती

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये १९ हजार ६४८ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे ते म्हणाले. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले; तर चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबरअखेर १ लाख ४७ हजार ८८१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

Jobs
प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी UPSC ने जारी केली अधिसूचना!

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ९०८ इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल, तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून करतात. त्यामुळे नोकरी इच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

मुंबईत ७ हजार ६८६ बेरोजगारांना रोजगार, ऑक्टोबर २०२१ मध्ये विभागाकडे ५१ हजार ८६२ इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ११ हजार ६९५, नाशिक विभागात ९ हजार ३९३, पुणे विभागात १३ हजार ९८४, औरंगाबाद विभागात ८ हजार ६७२, अमरावती विभागात ५ हजार ७१, तर नागपूर विभागात ३ हजार ४७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

१९ हजार ६४८ नोकरीला लागले ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १९ हजार ६४८ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ७ हजार ६८६, नाशिक विभागात ४ हजार ४, पुणे विभागात ४ हजार ७४२, औरंगाबाद विभागात २ हजार ३७४, अमरावती विभागात ४८४, तर नागपूर विभागात ३५८ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com