राज्यात नव्या 144 ओमिक्रॉन बाधितांची भर; विदेशी नागरिकांचाही समावेश

Omicron patients
Omicron patientssakal media

मुंबई :  आज राज्यात 144 ओमायक्रॉन बाधित (omicron new patients) रुग्णांची नोंद झाली. पुणे मनपा 144,सोलापूर 8,पुणे ग्रामीण 6, परभणी, जळगाव, मुंबई, रायगड, सातारा, आणि बीड प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 2343 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai international Airport) सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. (One hundred and forty four new omicron patients found in Maharashtra)

Omicron patients
दीड लाखाची एमडी पावडर जप्त; भिवंडीत कथित पत्रकाराला अटक

आज सापडलेल्या बाधितांपैकी 80 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था तर 64 बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी कळवले आहेत. एकूण रुग्णांपैकी 1171 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत 5674  प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 74 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com