राज्यातील आयटीआयमध्ये एक लाख ३७ हजार जागा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये यंदा जवळपास एक लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये सुमारे ८९ हजार ६१६ जागा; तर खासगी आयटीआयमध्ये ४७ हजार ६८२ जागा आहेत.

पुणे-  राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये यंदा जवळपास एक लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये सुमारे ८९ हजार ६१६ जागा; तर खासगी आयटीआयमध्ये ४७ हजार ६८२ जागा आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून, ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.

आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेत शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये पुणे विभागात जवळपास २८ हजार ४३२ अशा सर्वाधिक जागा आहेत; तर अमरावती विभागात १७ हजार ८०, औरंगाबाद विभागात १८ हजार ४८०, मुंबई विभागात १९ हजार ८३२, नागपूर विभागात २६ हजार ५७६, नाशिक विभागात २६ हजार ९०० अशा जागांवर यंदा प्रवेश होणार आहेत. राज्यातील जवळपास ४१७ शासकीय आणि ४५४ खासगी आयटीआयसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया होत आहे. प्रवेशप्रक्रियेबाबत सविस्तर माहिती ‘https://admission.dvet.gov.in’’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये ३० जूनपर्यंत सकाळी दहा ते अकरा या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित केल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh 37 thousand seats in the state's ITI