बचत गटाला एक लाखाचे खेळते भांडवल : मुख्यमंत्री

बचत गटाला एक लाखाचे खेळते भांडवल : मुख्यमंत्री

पांढरकवडा : बचत गटांच्या महिलांसाठी फिरता निधी साठ हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. या घोषणेला माहिलांनी भरभरून दाद दिली. 

महिला सक्षमीकरणांतर्गत सुमतीबाई सुकळीकर योजनेअंतर्गत बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमत्र्यांनी बचत गटांच्या महिलांचे कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगून 99 टक्के कर्जाची परतफेड या महिला करीत अलून, त्या स्वत: सक्षम होत आहेत. त्याचबरोबर समाजाला सक्षम करीत पर्यायाने देश सक्षम करीत आहेत. कोलाम, गोंडी आणि माडीया या आदिम जातींच्या विकासासाठी मंत्रालयात एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पारधी समाजाच्या विकासासाठीदेखील विशेष पारधी अधिकारी नेमला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 
यवतमाळ जिल्ह्यात एक हजार तीनशे गावांत 17 हजार बचत गटांची निर्मिती झाली. या बचत गटांना 123 कोटींचा फिरता निधी आणि 221 कोटींचा समुदाय निधी वितरित झाला. बॅंकांमार्फत दोन हजार कोटी उपलब्ध करून देण्यात आल्याचे ते म्हणाले.

बचत गटांमध्ये आता 35 लाख कुटुंबे असल्याने खऱ्या अर्थाने महिला सक्षम होत आहेत. 11 लाख 25 हजार आदिवासी लोकांचे 361 कोटींचे खावटी कर्ज माफ केले आहे, असे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com