
पुण्यातल्या दहशतवाद्याशी संबंधित तरुणाला अटक; महाराष्ट्र ATSची कारवाई
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने जम्मू मधून एका तरुणाला अटक केली आहे. टेरर फंडिंग प्रकरणात अटक सत्र सुरू करण्यात आलं आहे. त्याच संदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे.
हेही वाचा: लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कातील तरुण ताब्यात, पुणे ATS ची कारवाई
काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद अता मोहम्मद या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वी अटक केली होती. याच जुनैदच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करणारा हा तरुण असून आज त्याला पुणे न्यायलायात हजर करण्यात येईल.
हेही वाचा: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तौयबाचे 5 दहशतवादी ठार
काल दहशतवाद विरोधी पथकाने इनामुल हक या तरुणाला उत्तर प्रदेशमधून अटक केलं होतं. दहा हजार रुपये जुनेदच्या खात्यात आले होते त्यापैकी काही रक्कम इनामुलला दिली आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत. त्याचबरोबर इनामुल पाकिस्तानातील उमर नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचं देखील पोलिसांनी सांगितले होते.
Web Title: One Man Arrested In Connection With Terror Funding Pune Terrorist
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..