उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण एक पर्याय; एसटी संपावर अनिल परबांची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण एक पर्याय; एसटी संपावर अनिल परबांची प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्रात सध्या एसटी कामगारांचा संप सुरु आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील लालपरी थांबलेली आहे. एसटी कर्मचारी आणि सरकार यावर काय तोडगा काढतंय, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. असं असलं तरी अद्याप यावर काहीही तोडगा निघालेला नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या खासगीकरणाची बाब बोलून दाखवली आहे.

हेही वाचा: अमित शहा म्हणतात; 'नरेंद्र मोदींच्या घोषणेचं वेगळेपण असं की...,

परिवहन मंत्री अनिल परब म्हणालेत की, सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी खासगीकरण हा देखील एक पर्याय आहे. मात्र, या खासगीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सध्या झालेली नाही. इतर राज्यांमधल्या परिवहन मंडळांचा अभ्यास करुन आपण आपल्या राज्यांबाबत निर्णय घेऊ. याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा: 'कृषी कायदे' रद्द झाल्यानंतर काय म्हणालेत बॉलीवूड सेलिब्रेटी?

एसटी खासगीकरणाचा विचार आम्ही केलेला नाही. मात्र, वेगवेगळे जे पर्याय असतात त्यामधील एक पर्याय तो देखील असतो. मात्र, याबाबत सध्या विचार केला नाहीये. कामगार त्यांच्या भूमिकेवर अडून बसले आहेत. सरकार म्हणून लोकांची जबाबदारी जशी आमची आहे तशीच कामगारांचीही आमची आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु आहे.

loading image
go to top