
अमरावती : ‘‘हल्ली भिकारीसुद्धा एक रूपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला,’’ असे वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज येथे केले.कृषी विभागाने येथील नियोजन भवन येथे आज (ता.१४) आयोजित केलेल्या प्रयोगशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. यावेळी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतून शेतकरी उपस्थित होते.