ऑनलाइन वीजबिल भरायचंय? महावितरण देणार 'ट्रेनिंग'!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

महावितरणचे वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. वॉलेट पेमेंटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी महावितरणने प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन पैसे कसे भरावे, याचे धडे आता महावितरण देणार आहे.

औरंगाबाद - महावितरणचे वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. वॉलेट पेमेंटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी महावितरणने प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन पैसे कसे भरावे, याचे धडे आता महावितरण देणार आहे.

महावितरणने वीजबिल भरण्यासाठी वॉलेट पेमेंट सुविधा नुकतीच सुरू केली आहे. वॉलेट पेमेंटधारक होण्यासाठी महावितरणतर्फे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. वॉलेट पेमेंटधारक होण्यासाठी 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला अर्ज करता येईल. कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, छोटे, मोठे व्यापारी, बचतगट, वीजमीटर रीडिंग व बिल वाटप एजन्सी, एजंट वॉलेट पेमेंटधारक होऊ शकतात. म्हणूनच अशा इच्छुक वॉलेट पेमेंटधारकांना महावितरण प्रशिक्षण देणार आहे. महावितरण प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, नांदेड व लातूर परिमंडलातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संबंधितांनी संपर्क साधून नाव नोंदविण्याचे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुरेश गणेशकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Electricity Bill Payment Training by Mahavitaran