पालकांनो टिव्ही रिचार्ज करा! जिओ अन्‌ टाटा स्कायद्वारे ऑनलाइन शिक्षणाचे धडे

तात्या लांडगे
Sunday, 21 June 2020

पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे रेकॉर्डिंग सुरुच 
राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडे दूरर्शनचे काही चॅनेल आणि आकाशवाणीची वेळ उपलब्ध करुन देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. केंद्राकडून परवानगी मिळेपर्यंत आता जिओ आणि टाटा स्कायच्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. पुढच्या टप्प्यातील रेकॉर्डिंगही स्टूडिओतून सुरुच आहे. 
- दिनकर पाटील, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय, पुणे 

सोलापूर : राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा सुरु करण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी आता जिओ आणि टाटा स्कायची मदत घेतली जाणार आहे. केंद्राकडून दूरदर्शन व आकाशवाणी उपलब्ध होत नसल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, पालकांना आता त्यांच्याकडील टिव्ही तथा मोबाइल रिचार्ज करावा लागणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : सरकारने सांगूनही राज्यातील 14 जिल्हा बॅंकांचा कर्जवाटपात हात आखडताच 

कोरोनामुळे 15 मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या असून आता कधीपासून सुरु होतील, हे कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी राहावी, या हेतूने शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र, सद्यस्थितीत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी साधने अपुरी पडत असल्याने आता दृकश्राव्य माध्यमाद्वारे शिक्षण दिले जाणार आहे. शिक्षण विभागाने वर्गनिहाय अभ्यासक्रम तयार केला असून आणखी स्टूडिओच्या माध्यमातून रेकॉर्डिंग सुरुच आहे. यावर शिक्षण विभागाची उद्या (सोमवारी) मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होणार असून त्यांच्या हस्ते ऑनलाइन शिक्षणाच्या नव्या प्रयोगाचा शुभारंभ केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून दूरदर्शनचे काही चॅनेल आणि आकाशवाणीची वेळ उपलब्ध झाल्यास त्यामाध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याने सहायक कामगार आयुक्‍तांविरुध्द गुन्हा 

पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे रेकॉर्डिंग सुरुच 
राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडे दूरर्शनचे काही चॅनेल आणि आकाशवाणीची वेळ उपलब्ध करुन देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. केंद्राकडून परवानगी मिळेपर्यंत आता जिओ आणि टाटा स्कायच्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. पुढच्या टप्प्यातील रेकॉर्डिंगही स्टूडिओतून सुरुच आहे. 
- दिनकर पाटील, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय, पुणे 

हेही नक्‍की वाचा : 'आरटीई'अंतर्गत बुधवारपासून विद्यार्थ्यांना दिला जाणार प्रवेश 

शिक्षण विभागाची माहिती... 

  • पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जिओ टिव्ही आणि टाटा स्कायच्या माध्यमातून दिले जाणार ऑनलाइन शिक्षण 
  •  जिओ व टाटा स्कायचे सबस्क्राईबरची संख्या राज्यात मोठी; सरकारकडून काहीच घेतले जाणार नाही शूल्क
  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याबाबत दिली माहिती; आता सोमवारी (ता. 22) त्यावर होणार अंतिम निर्णय 
  • जुलैपासूनच शाळा सुरु करणे बंधनकारक असल्याचे शिक्षण विभागाने म्हटलेले नाही; कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घ्यावा 
  • भविष्यकालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु कराव्यात; घाईगडबडीचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी धोकादाय ठरू नये 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online learning now through Geo & Tata Sky