Online Scam: व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाली नोकरीची ऑफर, घातला 37 लाखांचा गंडा, नेमकं घडलं काय?

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नोकरीची ऑफर देऊन फसवणूक केली जात आहे.
Online Scam
Online ScamSakal

Online Scam: सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरीची ऑफर देऊन फसवणूक केली जात आहे.

ऑनलाइन फसवणुकीचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे, ज्यात एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून दररोज 2-3 हजार रुपये कमावण्याची ऑफर देण्यात आली आणि अखेर त्याच्या खात्यातून 37 लाख रुपये काढण्यात आले.

ठाण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीचा सध्याचा जॉब कॉन्ट्रॅक्ट लवकरच संपणार आहे, त्यानंतर त्याने ऑनलाइन रिक्रूटमेंट पोर्टलवर आपला बायोडाटा शेअर केला आहे.

यानंतर त्या व्यक्तीला इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. या मेसेजमध्ये नवीन नोकरीची ऑफर होती आणि ही नोकरी अर्धवेळ होती.

90 हजार रुपयांपर्यंत कमावण्याची ऑफर

व्यक्तीला या अर्धवेळ नोकरीत दररोज 2,000 ते 3,000 रुपये कमावण्याची संधी मिळेल, तसेच एका महिन्यात 90,000 रुपयांपर्यंत कमवू शकता असे आमिष दाखवण्यात आले.

गुन्हेगाराने व्यक्तीला सांगितले की, पार्ट टाइम जॉबमध्ये इंस्टाग्रामवर सेलिब्रिटींचे फोटो लाईक करावे लागतील. एका लाईकवर 70 रुपये दिले जातील.

यासाठी प्रत्येक लाईकचे स्क्रीनशॉट शेअर करावे लागतील. विश्वास जिंकण्यासाठी, व्यक्तीला 210 रुपये दिले गेले.

Online Scam
Cyber Crime News : सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ चिंताजनक; फेक अकाऊंट काढून बदनामी

टेलिग्राम ग्रुपमध्ये समावेश केला

यानंतर, पीडित व्यक्तीला टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले. यानंतर पीडित व्यक्तीला जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास सांगितले.

वृत्तानुसार, पीडित व्यक्तीने सुरुवातीला 9,000 रुपये गुंतवले आणि 9,980 रुपयांचा परतावा मिळाला. विश्वासात घेतल्यानंतर पीडित व्यक्तीला आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले.

Online Scam
Cyber Crime : पुण्यातल्या बँकेवर सायबर हल्ला; 439 बनावट ATM कार्ड बनवून एक कोटीच्या वर रक्कम लांबवली

37 लाख रुपयांचे नुकसान झाले

यानंतर पीडितेने सुमारे 37 लाख रुपये गुंतवले. यानंतर घोटाळेबाजांनी कोणताही परतावा दिला नाही. यानंतर त्याला फसवणूक झाल्याचे कळले. याप्रकरणी पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com