रिक्षा-टॅक्‍सीसाठी ऑनलाइन सर्वेक्षण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील रिक्षा-टॅक्‍सींचे प्रवासभाडे ठरविणे, त्यांचे टप्पे काय असावेत हे ठरविणे यासह वाहतुकीचा दर्जा आदी बाबींसंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात येत आहे. त्यात सहभागी होऊन ग्राहक, टॅक्‍सीचालक, रिक्षाचालक आणि रिक्षा-टॅक्‍सी संघटनांनी येत्या 15 मेपर्यंत आपली मते नोंदवावीत, असे आवाहन रिक्षा-टॅक्‍सीचे भाडेसूत्र ठरविण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष बी. सी. खटुआ यांनी शनिवारी येथे केले.

खटुआ म्हणाले,की रिक्षा-टॅक्‍सीचे दरसूत्र निश्‍चित करण्यासाठी मते मागविण्यात येत असून,त्यांचे विश्‍लेषण करून साधारण जून अखेरपर्यंत सरकारला अहवाल सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. ग्राहक, टॅक्‍सीचालक, रिक्षाचालक आणि रिक्षा-टॅक्‍सी संघटनांनी आपली मते नोंदवून हे सर्वेक्षण जास्तीत जास्त चांगले होण्यासाठी माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहेत.

Web Title: online survey for rickshaw-taxi