esakal | राज्यातील धरणांमध्ये केवळ 27 टक्केच पाणीसाठा !
sakal

बोलून बातमी शोधा

Dam

राज्यातील धरणांमध्ये केवळ 27 टक्केच पाणीसाठा !

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

धरणांमध्ये नवीन पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात आला आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांत पावसाने ओढ दिल्याने धरणांत अजूनही म्हणावा तसा पाणीसाठा झालेला नाही.

माळीनगर (सोलापूर) : पावसाळा चालू होऊन तब्बल सव्वा महिना उलटला आहे. या काळात मराठवाडा (Marathwada)), विदर्भ (Vidarbh) व कोकणाच्या (Konkan) काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे धरणांमध्ये (Dam) नवीन पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात आला आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांत पावसाने ओढ दिल्याने धरणांत अजूनही म्हणावा तसा पाणीसाठा झालेला नाही. राज्यातील एकूण तीन हजार 267 लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये 11 जुलैपर्यंत 17 हजार 846 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सरासरीच्या 27.29 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा साडेचार टक्‍क्‍यांनी कमी आहे. (Only 27 percent water storage have of the dams in the state)

हेही वाचा: दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख !

गेल्यावर्षी या काळात 31.88 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. जूनमध्ये कोकणात जोरदार पाऊस झाल्याने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली असून लघू प्रकल्पात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात काही प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यवतमाळमधील (Yawatmal)) बेंबळा, हिंगोलीतील (Hingoli) येलदरी, परभणीतील (Parbhani) निम्न दुधना, सिंधुदुर्गमधील (Sindhudurg) तिल्लारी, चंद्रपूरमधील (Chandrapur) असोळमेंढा, नागपूरमधील (Nagpur) तोतलाडोह, वर्ध्यातील (Wardha) निम्न वर्धा, जळगावमधील (Jalgaon) वाघूर, साताऱ्यातील (Satara) उरमोडी, तारळी, बारवी या धरणात 50 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. नाशिक (Nashik), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील सर्वच धरणांत 50 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. उजनीत शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

हेही वाचा: म्हारी छोरियॉं छोरों से कम हैं के..!

कोयना, जायकवाडी, उजनी, मुळा, पवना, वारणा अशी जवळपास 141 मोठी धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या धरणात नवीन पाणी पुरेशा प्रमाणात आलेले नसल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही. सध्या मोठ्या प्रकल्पात 15 हजार 486 द.ल.घ.मी. म्हणजे 32.28 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी मोठ्या प्रकल्पांमध्ये 35.84 टक्के पाणी उपलब्ध होते. अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पात 41.4 टक्के, औरंगाबाद विभागातील धरणात 35.34 टक्के, पुणे विभागातील धरणात 27.91 टक्के, कोकणातील धरणात 38.07 टक्के, नागपूर विभागातील धरणात 39.81 टक्के तर नाशिक विभागातील धरणात 26.61 टक्के पाणीसाठा आहे.

लघू, मध्यम व मोठ्या धरणांतील 11 जुलैपर्यंतचा विभागनिहाय पाणीसाठा (द.ल.घ.मी. मध्ये)

विभाग : संख्या : पाणीसाठा : (टक्केवारी)

  • अमरावती : 446 : 1918 : (31)

  • औरंगाबाद : 964 : 3488 : (25.46)

  • कोकण : 176 : 1439 : (38.41)

  • नागपूर : 384 : 2310 : (32.03)

  • नाशिक : 571 : 1911 : (20.54)

  • पुणे : 726 : 6779 : (25.87)

  • एकूण : 3267 : 17846 : (27.29)

loading image